रणतळ्याजवळील पाण्याचा व वाहतुकीचा प्रश्न कधी सुटणार? शेतकरी वाहन चालकांचा संताप जनक सवाल...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
स्थानिकांच्या चुकांमुळे रणतळ्या जवळील नाशिक - दिंडोरी - कळवण रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्यामुळे; परिसरातील शेतकर्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळं संतप्त शेतकरी आणि वाहन चालक.! रणतळ्याजवळील पाण्याचा व वाहतुकीचा प्रश्न कधी सुटणार? असा प्रश्न करीत आहेत.
या महामार्गावरील रणतळेजवळ शिवशक्ती पेट्रोलपंप, सप्तशृंगी पेट्रोलपंप आणि वृंदावंन लॉन्स यासह काही स्थानिक व्यावसायिकांच्या चुकांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. मंगळवार दि.२६ रोजी काल झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला असून, हे असे किती दिवस चालणार? याला वाली कोण? असा संतापजनक प्रश्न नागरिक / वाहन चालक शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक अडथळा निर्माण होत असल्याने, तसेच शेतकर्यांच्या शेतीमालाचे पाण्यामुळे नुकसान होत आहे. या ठिकाणी पुर्वी नैसगिक रित्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाणी जाण्यासाठी चार्या होत्या. या ठिकाणी व्यावसायिकांनी छोट्या साईजच्या मोर्या टाकल्यामुळे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्यावर जास्त प्रमाणात पाणी येत असल्याने 2 ते 3 तास रस्त्यावर वाहतूक ठप्प होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वनारवाडी येथील उपसरपंच दत्तू भेरे व ग्रामस्थांनी तक्रार करुनही कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी याकडे लक्ष देवून हा प्रश्न मिटवावा अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.