सेवानिवृत्त होणारे सेवक मविप्र संस्थेसाठी मार्गदर्शक - ऍड नितीन ठाकरे...

सेवानिवृत्त होणारे सेवक मविप्र संस्थेसाठी मार्गदर्शक - ऍड नितीन ठाकरे...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

मविप्र शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त होणारे सर्व सेवक हे संस्थेसाठी मार्गदर्शक असून संस्थेसाठी या सेवकांनी पुढेही मार्गदर्शक व सहकार्य करावे असे आव्हाहन मविप्र संस्थेचे सरचिटणीस ऍड नितीन ठाकरे यांनी केले.

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रमेश वडजे यांच्या सेवापूर्ती कर्यक्रमप्रसंगी ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

 एका शिक्षकाच्या कुटुंबात जन्माला आले खेड्यातून शिकले परंतु प्रत्येक शाखेत कार्यकरताना त्यांनी त्यांच्याजवळ असलेले जे कौशल्य आहे त्याचा यथोचित वापर केला मितभाषी माणसं हे कार्य तत्पर असतात त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री.वडजे सर भविष्यामध्ये अशा तंत्रस्नेही व आदर्श व्यक्तींची संस्थेला मार्गदर्शक म्हणून गरज वाटेल तेव्हा हाक दिल्यास सहकार्य करावे .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. 

अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्रवीण जाधव यांनी देखील "शिक्षक हा समाज उद्धाराचा खरा आत्मा आहे .शिक्षकाच्या हातून समाज विकासाच्या वाटा ह्या प्रकाशमय होतात शिक्षकास किती अडचण असली तरी तो मोठ्या मनाने ते अडचण झाकून ठेवतो आणि समाजास ज्ञानदानाचे काम त्या ठिकाणी करत असतो .

भविष्यातील नवीन पिढीला जुन्या मार्गदर्शकांची गरज असते असे विचार व्यक्त केले.

यावेळी प्रास्तविक प्राध्यापिका एस एस संधान यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर मविप्र सरचिटणीस ऍड नितीन ठाकरे,रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य डी. एस. वडजे,मविप्र संस्थेचे माजी संचालक दिलीपराव मोरे, निसाका चे माजी चेअरमन भागवत बाबा बोरस्ते,संचालक शिवा अप्पा गडाख,सौ. शोभाताई बोरस्ते,सेवक संचालक डॉ. एस के शिंदे,सी डी शिंदे,जगन्नाथ निंबाळकर,जेष्ठ नेते विठ्ठलराव अपसुंदे, माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे, मविप्र शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव,माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे,दौलत उखर्डे अनिल देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.

कुटुंबाच्यावतीने कन्या व पत्नी सौ वडजे यांनी माहिती दिली.

यावेळी दिलीपराव मोरे,भागवत बाबा बोरस्ते, डॉ. एस. के. शिंदे, डॉ. भास्करराव ढोके यांनी मार्गदर्शन करून वडजे सरांच्या कार्याचा गौरव केला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेच्यावतीने सरस्वतीचा पुतळा, शाल-श्रीफळ, वस्त्र, भगवगीता ग्रंथ देऊन प्राचार्य रमेश वडजे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन संतोष कथार यांनी तर आभार रावसाहेब उशीर यांनी मानले.