कष्ट करण्याची जिद्द ठेवल्यास यश हमखास मिळते - प्रवीण जाधव

कष्ट करण्याची जिद्द ठेवल्यास यश हमखास मिळते - प्रवीण  जाधव

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

यशाच्या शिखरावर जायचे असेल तर कष्टांची शिदोरी व निष्ठा आपल्याबरोबर ठेवा प्रतिष्ठा व यश आपोआप मिळेल असे प्रतिपादन मविप्र समाज संस्थेचे संचालक प्रवीण  जाधव यांनी केले. दिंडोरी येथील जनता इंग्लिश स्कुलच्या उपशिक्षिका मंगला बागुल यांनी आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले व विद्यालयाचा माजी विद्यार्थी नितीन भास्कर देशमुख यांनी महाराष्ट्र करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदावर महाराष्ट्र राज्यात तिसरा क्रमांक मिळवल्याबद्दल या दोघांचाही विद्यालयाच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून प्रवीण जाधव बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, मंगला बागुल व नितीन देशमुख यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कष्ट केल्यास भविष्यात लोकांची गुलामी करण्याची गरज नाही व आपल्यातली अंतरिक ऊर्जा जागृत ठेवा ज्या दर्जाचे तुमचे विचार असतील त्याच दर्जाचे तुम्हाला आयुष्य लाभते हे पूर्वीपासून आजपर्यंत अनेक थोरामोठ्यांच्या विचारांमधून दिसत असते.आपण संस्थेविषयी व शाळेविषयी ऋण व्यक्त करून शाळेला व संस्थेला आपण मदतीचा हात द्याल व समाजाचे चांगले कार्य कराल अशी अपेक्षा ठेवतो."यावेळी माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे अभिनव स्कूल कमिटी अध्यक्ष दौलत उखर्डे,उद्धव अण्णा मोरे,माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते,कृउबा उपसभापती कैलास मवाळ गणपतराव जाधव,सुभाष बोरस्ते, सोमनाथ सोनवणे,सुभाष देशमुख, मधुकर जाधव,ज्योतीताई देशमुख,साहेबराव घोलप,कैलास हरिकमहाले,चिंतामण जाधव,अशोक निकम,रणजित देशमुख,पवन देशमुख,डीएड कॉलेजचे प्राचार्य डॉ संजय काळोगे,आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविकात प्राचार्य रमेश वडजे यांनी केले.मंगला बागुल यांनी आपल्या जीवनकार्याच्या यशाचे रहस्य सांगत प्रयत्न व कष्टांची जोड असेल तर यश हे निश्चित असतं. 

नितीन देशमुख यांनी देखील सर्वांचे व संस्थेचे ऋण व्यक्त केले. यात माझ्या कुटुंबीयांचा शाळेचा संस्थेचा सर्वांचा हा बहुमान असल्याचे सांगितले.दोन्ही सत्कारमूर्तींना सन्मानचिन्ह व गौरवपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बागूल यांचे वडील पोलीस पाटील दामोदर बागुल,रत्ना बागुल पती प्रा.नामदेव गावित,तसेच नितीन देशमुख यांचे आजोबा दिगंबर देशमुख,आई वडील भास्कर देशमुख,चंद्रकला देशमुख यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी गौरवपत्राचे वाचन श्री संतोष कथार यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.एस एस संधान यांनी तर आभार पर्यवेक्षिका प्रतिभा मापारी यांनी केले.