दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघात नवीन मतदान केंद्रांना मंजुरी...

दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघात नवीन मतदान केंद्रांना मंजुरी...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी - पेठ तालुक्यात मतदार यादीचे विशेष पुनरिक्षण कामकाज २०२४ अंतर्गत नव्याने प्रस्तावित मतदार यादी भागांना भारत निवडणूक आयोग यांच्याकडून मंजुरी मिळाल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांत अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार विधानसभा मतदार यादीचे पुनरिक्षणाचे कामकाज नाशिक जिल्ह्यात करणेत येत आहे. त्यानुषंगाने दिंडोरी - पेठ विधानसभा मतदारसंघात दि. १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा)२०२४ घोषित केला आहे.सदर कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्राच्या स्थानात बदल,२ कि.मी.पेक्षा जास्त मतदान केंद्र आणि १४०० व १५०० पेक्षा जास्त मतदार संख्या असलेले मतदान केंद्र यामध्ये बदल करण्याबाबत निर्देशित केले होते. त्याअनुषंगाने दिंडोरी विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राच्या स्थानात बदल ६ आणि १४०० व १५०० पेक्षा जास्त मतदार असलेले मतदान यादी भाग क्रमांक १७भारत निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले होते. त्यानुसार मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे दि.२७  जुलै २०२४ च्या पत्रान्वये दिंडोरी  विधानसभा मतदारसंघाकडून सादर केलेले एकुण २३ प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे. 

मतदान केंद्र स्थानात बदल-(पाहुचीबारी)  जि.प.प्रा. शाळा विरमाळ दक्षिणकडील इमारत पश्‍चिमेकडून खोली क्र.1, (दगडपिंप्री) नवीन इमारत प्रा.शाळा पुर्वेकडून खोली क्र. 1, (शिवारपाडा) जि.प.प्रा. शाळा नवीन इमारत पुर्वेकडून खोली क्र.1, (कुर्णोली)जि.प.प्रा.शाळा  पुर्वेकडून खोली क्र. 2, (जानोरी) महात्मा फुले विद्यालय दक्षिणकडून खोली क्र्र. 1, (जानोरी) महात्मा फुले विद्यालय दक्षिणकडून  खोली क्र. 2 या प्रमाणे बदल झालेला आहे. त्याचप्रमाणे नव्याने बदल झालेले मतदान केंद्राचे ठिकाणाचा पत्ता  व मतदान केंद्र- बाबापूर- जि.प.शाळा उत्तरेकडून स्वतंत्र खोली, कसबेवणी- के. आर. टी. कॉलेज पुर्वेकडून दक्षिणोत्तर इमारत दक्षिणकडून खोली क्र. 7,  तळेगाव वणी - जि.प.शाळा दक्षिणकडून खोली क्र. 4, कृष्णगाव - षटकोनी इमारती जि.प. शाळा पश्‍चिमेकडून खोली क्र. 2, जालखेड - जि.प.शाळा पश्‍चिमेकडून खोली क्र. 1, पेठ - डॉ. विजय बिडकर विद्यालव व क. महाविद्यालय पश्‍चिमेकडून खोली क्र. 2, 3, 4 व 5, निगडोळ - जि.प.शाळा पश्‍चिमेकडून खोली क्र. 2, बोपेगाव - जि.प.शाळा उत्तरेकडून खोली क्र. 4, दिंडोरी जि.प.शाळा क्र. 1 नवीन इमारत पालखेड रोड, उत्तरेकडून खोली क्र. 1,  दिंडोरी जि.प.शाळा क्र. 1 नवीन इमारत पालखेड रोड, उत्तरेकडून खोली क्र.3, उमराळे बु. - जि.प.शाळा  नवीन इमारत पुर्वेकडून खोली क्र.1, म्हसणविरा - जि.प.शाळा पुर्वेकडून खोली क्र.1, देवळाचापाडा - जि.प.शाळा देवळाचापाडा उत्तरेकडून खोली क्र. 1,मोहाडी - जि.प. शाळा पुर्वेकडून खोली क्र. 6, अक्राळे - जि.प.शाळा पुर्वेकडून खोली क्र. 3, कुळवंडी - जि.प..शाळा पश्‍चिमेकडून खोली क्र. 2 या प्रमाणे बद्ल करण्यात आली आहे.