संदीप गुंजाळ यांना आदर्श पत्रकार पुरस्कार...
![संदीप गुंजाळ यांना आदर्श पत्रकार पुरस्कार...](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_65a11840e1f25.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी : नाशिक येथील कालिकादेवी मंदिर संस्थेतर्फे राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील रहिवासी तथा पत्रकार संदीप गुंजाळ यांना देण्यात आला.
त्यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांच्या कार्याची पावती म्हणून ५ जानेवारी २०२४ ला पत्रकार दिनाचे औचित्य साधून (कै.) कृष्णाराव पाटील कोठावळे उत्तर महाराष्ट्र पत्रकारिता पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा संस्थेचे अध्यक्ष केशवराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या या पुरस्काराबद्दल दिंडोरी तालुका पत्रकार संघाच्यावतीने नुकताच गुंजाळ यांचा बाळासाहेब अस्वले, सुखदेव खुर्दळ, अशोक निकम, बापू चव्हाण, अमोल जाधव, श्रीराम देवकर, मनोज पाटील आदींनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.