ग्रामपंचायत राका येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी...

ग्रामपंचायत राका येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी...

 प्रतिनिधी - सुधीर शिवणकर

गोंदिया : सडक/अर्जुनी तालुक्यातील राका ग्रामपंचायत येथे दि. १२ जानेवारी 2024 (आज) रोजी  राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली आहे.

यावेळी उपसरपंच मधु दोनोडे यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकून माहिती सांगितली. यावेळी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष शंकर मेंढे, ग्रामपंचायत सदस्य शिल्पा चांदेवार, कांता नागोसे, सुरेखा बहेकार, विमल मारवाडे, चुन्नीलाल हरडे, रामू चांदेवार, बळीराम भेंडारकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.