वाहतूक समस्या दूर करण्यासाठी खा. भास्कर भगरे यांनी घेतली प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट...

वाहतूक समस्या दूर करण्यासाठी खा. भास्कर भगरे यांनी घेतली प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट...

प्रतिनिधी - बापू चव्हाण नाशिक,

नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावरील सावळ घाटात होणारी सातत्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्या आदींसह वाहतूक विभागातील विविध समस्या संदर्भात खासदार भास्कर भगरे यांनी नाशिक परिवहन कार्यालयात प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांची भेट घेत चर्चा केली.

नाशिक पेठ मार्गावर सावळ घाट कोटांबी घाट येथे सातत्याने अपघात होत वाहतूक ठप्प होत असल्याने परिसरातील नागरिकांचे तसेच वाहन धारकांचे मोठे हाल होत आहे शेतकऱ्यांची शेतमालाची वाहने अडकून शेतमालाचे नुकसान होत आहे. सदर घाटाचे रुंदीकरण काम मंजूर झाले असून सदर काम लवकरच सुरू होईल मात्र सध्या होणारी वाहतूक कोंडी दूर होणे गरजेचे असून त्यासाठी आरटीओ व पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्या.बोरगाव आरटीओ चेकपोस्ट वरील स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याची मागणी केली याबाबत उपययोजना करण्याचे आश्वासन दिले.

दिंडोरी शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिग्नल बसविण्याबाबत प्रशासकीय कार्यवाही त्वरित करण्यास सांगितले. परिवहन अधिकारी शिंदे यांनी विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.  यावेळी  वाहतूक विभागाच्या संदर्भात विविध विषयांवर चर्चा झाली.शासनाने टॅक्सी रिक्षा चालकांसाठी सुरू केलेल्या कल्याणकारी मंडळाची माहिती देण्यात आली.यावेळी प्रादेशिक परिवहन  विभागाचे अधिकारी उपस्थित होते.