किनगाव पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न...

किनगाव पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न...

NEWS15 मराठी प्रतिनिधी -  असलम शेख, लातूर

सध्या राज्यात मराठा, धनगर, ओबीसी आरक्षण साठी आंदोलने केली जात आहेत. किनगाव पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक, पोलिस पाटील, विविध पक्षाचे कार्यकर्ते यांची बैठक पोलिस ठाण्यात गुरुवारी दुपारी पार पडली आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी सहायक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे, माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे, माजी सरपंच किशोर मुंडे, उपसरपंच विठ्ठलराव बोडके आदी जण प्रमुख उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की किनगाव हे आपले गाव शांतताप्रिय म्हणून ओळखले जाते आणि तशीच

ओळख कायम राहावी या साठी सर्व नागरिकांनी प्रयत्न करावेत व सोशल मीडियावर व्हायरल होणारा संदेश चुकीचा की बरोबर याबाबत योग्य ती खात्री करावी. कोणतेही आंदोलन करायचे असेल तर पोलिस परवानगी घेऊन योग्य मागनि आंदोलन करावेत.आपल्या गावची ओळख व आपल्या गावातील नागरिकांचा एकमेकांशी असलेला जिव्हाळा व सलोखा अबाधित राहील याची सर्वांनी काळजी घ्यावी व प्रशासनाने केलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या बैठकीत विविध पक्षाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, पोलिस पाटील, विविध समाजाचे कार्यकर्ते आदी जण उपस्थित होते.