दिंडोरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये मास व मद्य विक्री बंद...
![दिंडोरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये मास व मद्य विक्री बंद...](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_65abc12059bca.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये दि. 22 जानेवारी रोजी श्रीक्षेत्र आयोध्या धाम येथे श्रीराम मूर्ती प्रांत प्रतिष्ठा उत्सव साजरा होत असल्याने व गावात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन असल्याने गावातील सर्व मटन,चिकन,मच्छी तसेच देशी,विदेशी मद्द विक्री बंद ठेवण्यात यावी असे परिपत्रक तालुक्याच्या ग्रामपंचायतीनच्यावतीने काढण्यात आले आहे.
या पत्रकाद्वारे सूचनेसह विनंती करण्यात आली आहे. देशातील अतिशय महत्वपूर्ण असणारा हा उत्सव सर्वांना आनंदाने व गुण्या गोविंदाने पाहता यावा व त्याच्यामध्ये सहभागी होता यावे त्यामुळे गावातील वातावरण शांततापूर्ण व संस्कारक्षम असावे या उद्देशाने सदर निर्णय घेण्यात आले आहे. तरी गावातील सर्व मटन, चिकन, मच्छी, तसेच देशी-विदेशी मद्द विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी ग्रामपंचायतच्या सूचनेप्रमाणे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.