गोंदियात व्यापारी फेडरेशनच्या'वतीने कारसेवकांचा सत्कार...

गोंदियात व्यापारी फेडरेशनच्या'वतीने कारसेवकांचा सत्कार...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - आकाश वालदे, गोंदिया

संपूर्ण देशभरामध्ये 22 तारखेला अयोध्या येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वी भगवामय वातावरण निर्माण झाला असून गोंदियात देखील विविध कार्यक्रम करण्यात येत आहेत. अशातच गोंदिया जिल्हा व्यापारी फेडरेशनच्या वतीने 1992 मध्ये ज्या कारसेवाकांनी निस्वार्थ भावनेने कार्य केले होते. अशा 48 कार सेवकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांनी देखील त्यावेळी कारसेवक म्हणून सेवा दिली होती. त्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला. तर या निमित्ताने कारसेवकांनी त्या 1992 च्या वेळी घडलेले प्रसंग सांगून आठवणींना उजाळा दिला.