वनारवाडी येथे उद्या ७ रोजी खंडोबा यात्राउत्सव..

वनारवाडी येथे उद्या ७ रोजी खंडोबा यात्राउत्सव..

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी खंडोबा डोंगरावरील खंडोबा महाराज यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती उपसरपंच दत्तू भेरे यांनी दिली.

यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजित आयोजन करण्यात आले असून, सकाळी ८ वाजता महाअभिषेक, ११ वाजता सविता साळुंखे जागरण पार्टी (खंडोबाची वाकडी) यांचा गोंधळाचा कार्यक्रम होणार असून, दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ, महिला बच गट, पुरुष बचत गट, वनारवाडी मित्र मंडळ यांनी केले आहे.