युवक हेच देशाचे भविष्य आणि आधारस्तंभ - स.पो.नि. भाऊसाहेब खंदारे.! साळुंकवाडी येथे विशेष युवक शिबिराचा समारोप...

युवक हेच देशाचे भविष्य आणि आधारस्तंभ - स.पो.नि. भाऊसाहेब खंदारे.! साळुंकवाडी येथे विशेष युवक शिबिराचा समारोप...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारत.! खेड्यात ग्रामीण भागात असून ग्रामीण भागातील समस्या रासेयोच्या विद्यार्थ्यांनी समजुन घेऊन, युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास हे उद्दिष्ट ठेवून सात दिवसीय शिबिराचा समारोप समारंभ संपन्न करताना युवक हेच देशाचे भविष्य आणि आधारस्तंभ आहेत याची जाणीव ठेवावी असे प्रतिपादन किनगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांनी महात्मा फुले महाविद्यालय किनगावच्यावतीने आयोजित विशेष युवक शिबीर २०२४ मौजे साळुंकवाडी येथे विशेष शिबिराच्या समारोप समारंभ प्रसंगी शनिवार दि २० जानेवारी २०२४ रोजी केले.

या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री छञपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामजी (बप्पा )बोडके होते तर प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे,उपप्राचार्य प्रा.डॉ. विठ्ठल चव्हाण , पोहेकाँ व्यंकट महाके ओम जाधव, धनजंय साखरे,  तातेराव साळुंके, ब्रम्हानंद साळुंके, कृष्णा सांळुके,दिलीप पवार उत्तम सांळुके,भगवान साळुंके, मुख्याध्यापिका सुप्रिया थेटे, अंगणवाडीताई जयश्री पवार, -हनुमंत साळुंके आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण कण्यात आला त्यानंतर रा से यो चे  कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. भारत भदाडे यांनी प्रास्ताविक मांडताना या शिबीरात एकूण ५० स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी असून त्यात मुले २५ आणि मुली २५ आहेत या विद्यार्थीच्या सहकार्यातून  शिबिरांतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर,मोफत पशु रोग निदान व उपचार शिबिर,बालविवाह प्रतिबंध, मतदार जनजागृती,रस्ता सुरक्षा काळाची गरज, डिजिटल साक्षरता,वाचन संस्कृती व ग्रंथालय,मृदा संवर्धन पाणी व्यवस्थापन आदी विषयावर व्याख्यान, प्रबोधन कार्यक्रम आयोजीत केले याची माहिती दिली त्यानंतर,विद्यार्थिनी प्रतिनिधी कु समिक्षा सरकाळे आणि विद्यार्थी प्रतिनिधी कु संघर्ष कांबळे यांनी शिबिरातील सात दिवसातील स्वयं अनुभव कथन करत स्वयंशिस्त लाभली असे सांगीतले या प्रसंगी ओम जाधव, उपप्राचार्य डॉ विठ्ठल चव्हाण यांनी समायोचित मनोगत व्यक्त केले याप्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना राम बोडके म्हणाले की,महाविद्यालयीन युवकांनी महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन महाविद्यालयाचे नांव उंचवावे  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन कु शुभम कांबळे यांनी मानले या कार्यक्रमासाठी प्रा. बालाजी आचार्य, प्रा. पांडुरंग कांबळे, प्रा. अनंत सोमुसे, प्रा डॉ बळीराम पवार, प्रा.डॉ. सदाशिव वरवटे, प्रा.गोपाळ इंद्राळे, प्रा. उद्धवराव जाधव ,प्रा. विक्रम गायकवाड, प्रा. डॉ. दर्शना कानवटे ,प्रा. पदमजा  हगदळे ,प्रा. मिरा शिंदे,सेवक किशन धरणे रा से यो विद्यार्थी प्रतिनिधी कु शुभम कांबळे, कु ओमकार क्षिरसागर कु अनिकेत लटपटे, कु प्रतिक बडगे, कु  ऋषीकेश एखबळे कु लक्ष्मण कांबळे, कु माधव डोंगरे, कु तुकाराम पांचाळ , कु मनोज आलट ,रा से यो विद्यार्थीनी कु अमृता सोमवंशी, कु समिक्षा शेळके, कु प्रतिक्षा मुंढे कु अंजली चाटे, कु ज्ञानेश्वरी दळवे, कु आशा चाटे, कु सृष्टी नवने , कु ऐश्वर्या आदरराव, कु दिव्या शेळके, कु नेहा वाघमारे आदि स्वयंसेवकाची उपस्थिती होती.