खडक सुक्याने येथे महिला वर्गाकडून, हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

खडक सुक्याने येथे महिला वर्गाकडून, हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील खडक सुकेने येथे गेल्या तीन वर्षापासून येथील महिलांनी पारंपारिक पद्धतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू केला असून याही वर्षी गावातील महिलांनी एकत्र येऊन संक्रांतीचे औचित्य साधून व विचारांची देवाण घेवाण करून एकमेकांना पारंपारिक पद्धतीने वाण देऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या माजी सदस्य माधुरी गणोरे ह्या होत्या. प्रथमतः आई तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महिलांना वेगवेगळे उखाणे घेऊन कार्यक्रमात रंगत आणली. याप्रसंगी शालिनी गणोरे, रूपाली जाधव, शोभा गणोरे, प्राजक्त खांदवे रूपाली कळमकर, सारिका गणोरे, पूजा गणोरे, ज्योती गणोरे, आरती गणोरे चंद्रकला गणोरे, वर्षा जाधव, सुमन कळमकर, स्वाती कळमकर उषा ढोकरे, योगिता ढोकरे, अनिता गणोरे, नंदा गणोरे, सोनाली गणोरे, शुभांगी गणोरे, सविता गणोरे, सविता कातोरे, मनीषा गणोरे, कोमल कातोरे, लीला कातोरे, हिराबाई कातोरे, पूजा गणोरे, ज्योती गणोरे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.