अजबच घटना.! मोहाडी येथे गाईने दिला चक्क तीन वासरांना जन्म...
![अजबच घटना.! मोहाडी येथे गाईने दिला चक्क तीन वासरांना जन्म...](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65d390c4c8bf4.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील शेतकरी व दुग्ध व्यवसाय करणारे प्रतापराव रघुनाथ पाटील यांच्या गाईने तीन वासरांना जन्म दिल्याची दुर्मिळ घटना घडली आहे. याआधी दोन वासरांना जन्म दिल्याच्या घटना ऐकण्यास मिळाल्या आहे.
आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना या युक्तीप्रमाणे या गाईने तीन वासरांना जन्म दिल्याने हे तिन्ही वासरे सुदृढ असून पाटील यांना मिळालेल्या या गो धनाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.