दिंडोरी शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी शहरासह तालुक्यात आज सोमवार दि.१९ रोजी सर्वत्र शिवजयंती ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दिंडोरी शहरामध्ये एक दिवस आधी शिवाजी महाराजांचे अठरावे रूप या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्वत्र तालुक्यात सर्वत्र भगवेमय वातावरण झाले होते. यावेळी अनेक मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर काही ठिकाणी रक्तदान शिबिर,व्याख्यात्यांचे व्याख्याने किर्तन,भजन,प्रसिद्ध कवींच्या कविता यासह काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी क्रीडा खेळांचे प्रात्यक्षिक करून उपस्थित त्यांचे मने जिंकली काही ठिकाणी मिरवणुकीमध्ये डीजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरत नृत्य केले असे अनेक प्रकारचे कार्यक्रम होऊन शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यामध्ये नगरपंचायत, ग्रामपंचायत, जि.प.प्राथमिक शाळा, विद्यालये, शासकीय कार्यालये, सोसायटी यासह अनेक ठिकाणी तालुक्यात शहराप्रमाणे ग्रामीण भागातही नागरिकांमध्ये तरुणाईमध्ये महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.