पाटणबोरी येथील वीज 20 तासापासून बंद? भर उन्हाळ्यात जनता हैराण...
![पाटणबोरी येथील वीज 20 तासापासून बंद? भर उन्हाळ्यात जनता हैराण...](https://news15marathi.com/uploads/images/202404/image_750x_6617acc9aa432.jpg)
प्रतिनिधी - गजू कैलासवार, यवतमाळ
पाटणबोरी - दि. 09 एप्रिल रोजी रात्री 9 च्या सुमारास विजेचा कडकडाट झाला आणि मुसळधार पाऊस सुद्धा आला. यावेळी ढोकीजवळ एक झाड 33 केव्ही लाईन वर पडल्याने दोन इंसुलेटर उडाले. सदर फॉल्ट ढोकी गावाजवळ पाटणबोरी ते पांढरकवडा दरम्यान झाला. हा फळ काढायला एम एस ई बी ला जवळपास 20 तासाचा अवधी लागला.
मात्र या वीस तासा दरम्यान नागरिक मात्र उन्हाने होरपळून गेले. उन्हाची तीव्रता वाढल्याने कूलर फ्रिज फॅन चा वापर सुरू झालेला आहे. मात्र वीस तासांमध्ये फॅन कुलर फ्रिज बंद झाल्याने त्यातच उन्हाचा उकाडा वाढल्याने जनता हैरान झाली.
लाईन केव्हा येणार हाच विषय दिवसभर ज्यांच्या त्यांच्या तोंडावर होता. पीठ गिरण्या बंद असल्याने लोकांचे दळण बंद झाले. हॉटेल्स व सार्वजनिक जेवणावळी रेस्टॉरंट यांची चांगलीच पंचायत झाली. दुकानातील काटे बंद झाल्याने दुकानदाराची फजिती झाली. बोरचे पाणी काढू न शकल्याने पिण्याच्या पाण्याकरिता नागरिकांची चांगलीच वणवण झाली. जिथे तिथे लोक पाणी भरताना दिसून येत होते. जीवनातील अविभाज्य घटक असलेला मोबाईल स्विचऑफ झाल्याने बऱ्याचश्या मोबाईल धारकांची धांदल उडाली . टीव्ही फ्रिज यासारखी सर्व इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडली.
याबाबत महावितरणचे कनिष्ठ अभियंता चव्हाण यांना विचारणा केली असता; पांढरकवडाकडून पाटणबोरी कडे येणाऱ्या 33 केवी लाईनवर झाड पडल्याने फॉल्ट झाला होता. दोन इन्सुलेटर उडाले होते. फार शोधणे आणि तो दुरुस्त करणे याला अवधी लागला. हा फॉल्ट जवळपास 10 एप्रिल ला दुपारी तीन वाजता क्लियर झाल्यानंतरही गावामध्ये छोटे छोटे फॉल्ट असल्याने गावातील काही लाईन बंद तर काही लाईन चालू होती. उन्हाचा उकाडा वाढल्याने नागरिक दिवसभर चांगलेच हैरान झाले होते.