तंटामुक्ती समिती सक्षम करणे काळाची गरज - पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर
![तंटामुक्ती समिती सक्षम करणे काळाची गरज - पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65d0e831262b8.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण
गावोगाव स्थापन झालेल्या तंटामुक्ती समिती सक्षम करणे ही काळाची गरज असून मडकीजांब तंटामुक्ती समितीने केलेले कार्य आदर्शव्रत असल्याचे प्रतिपादन दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी मडकीजांब येथे कार्यक्रम प्रसंगी केले.
दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब येथे आज दि.१७ रोजी तंटामुक्ती समितीच्या नुतन नामफलक अनावरण तसेच नवनियुक्त पोलीस अधिकारी स्वागत कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर पोलीस पाटील संघटनेचे राज्य सल्लागार चिंतामण पाटील मोरे तसेच पोलीस उपनिरीक्षक देशमुख पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष पांडुरंग गडकरी, वामन पाटील, अर्चना अनवट, रोशन परदेशी, सविता ढगे, एकनाथ अनवट, राजेंद्र ढगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मडकीजांब पोलीस पाटील रोहिणी वडजे यांनी केले.
चिंतामण पाटील मोरे यांनी मनोगतातून सांगितले की सन 2007 पासून मडकीजांब गावातील तंटामुक्ती समितीचे कार्य कौतुकास्पद असून माजी पोलीस पाटील कै. वसंतराव वडजे, विद्यमान पोलीस पाटील रोहिणी वडजे यांच्या कार्यकाळात शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवून गावाने तालुक्यापुढे आदर्श ठेवला असल्याचे सांगितले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक देशमुख, तंटामुक्ती समिती अध्यक्ष साहेबराव वडजे, माजी अध्यक्ष रघुनाथ जगताप, सचिन वडजे, समीर वडजे, गोकुळ वडजे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम सूत्रसंचालन सचिन वडजे यांनी केले तर आभार कैलास गायकवाड यांनी मानले.