भंडाऱ्यातील शासकीय अध्यापक महाविद्यालय घाणीच्या विळख्यात...

भंडाऱ्यातील शासकीय अध्यापक महाविद्यालय घाणीच्या विळख्यात...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा

भंडाऱ्यातील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील वर्गखोल्यात विद्यार्थी नाहीत. तर बेंचावर सर्वत्र चीचड्याच-चिचड्या दिसत असून, इथं अध्यापक घडतात की चिचडी खताचे प्रशिक्षक असा प्रश्न जिल्ह्यातील पालक वर्गांकडून  होत आहे.

भंडाऱ्यातील शासकीय अध्यापक  महाविद्यालयातील सर्व वर्ग खोल्यांमध्ये  सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तरी मात्र या महाविद्यालयातील प्राचार्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्व पालक वर्गांकडून तसेच प्रतिष्ठित नागरिकांकडून होत आहे. याकडे शासनाने तात्काळपणे लक्ष देऊन, इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करून, त्या संबंधित प्राचार्यांवर कारवाई करण्याची मागणी सर्व पालक वर्गांकडून तसेच विद्यार्थी वर्गांकडून  होत आहे.