मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या'वतीने; शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी...

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या'वतीने; शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी...

 प्रतिनिधी - गजू कैलासवार, यवतमाळ

पाटणबोरी/मारेगाव : मार्क्सवादी कम्युनीष्ट पक्षाच्या वतीने दिनांक 27 सप्टेंबर रोजी शहीद  ए आजम भगतसिंग यांची 118 वी जयंती साजरी करण्यात आली.

 इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरुद्ध एल्गार पुकारून भारत मातेच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात अग्रेसर राहून शहादत अर्पण केली अशा या क्रांतिकारकांचा इतिहास आपल्याला विसरता येणार नाही यावेळी अनेक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या औकार्यकर्त्यांनी इन्कलाब जिंदाबाद पुंजीवात मुर्दाबाद असा नारा देऊन अभिवादन केले .

यावेळी कॉम्रेड श्रीकांत तांबेकर , पुंडलिकराव ढुमणे , रामभाऊ जिद्देवार ,शेख खलील, बालाजी टेकाम, धनंजय भोयर ,सुरज भोयर ,नानाभाऊ घोटेकर, रोडे काका व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित राहून महान क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले.

तरी तमाम युवकांनी भगतसिंगाची प्रेरणा घेऊन आपल्या ठिकाणी चैतन्य निर्माण करावे असा आशावाद मनाशी बाळगून भगतसिंगाच्या स्वप्नातला भारत आपण निर्माण करावा व त्यातून प्रेरणा घ्यावी असे आव्हान तमाम कष्टकरी युवक शेतकरी यांना करीत आहे.