वलखेड येथे २२ रोजी विश्वकर्मा जयंती उत्सव...

वलखेड येथे २२ रोजी विश्वकर्मा जयंती उत्सव...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे गुरुवार दि.२२ रोजी श्री भगवान विश्वकर्मा जयंती उत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष शरद शिरसाट सरचिटणीस उमेश आहेर यांनी दिली आहे.

या विश्वकर्मा जयंती निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्या असून यामध्ये सकाळी ८ ते ९ सत्यनारायण पूजन ९ ते १० भगवान विश्वकर्मा प्रतिमा मिरवणूक १० ते १२ ह.भ.प. निवृत्ती महाराज शिंदे (वलखेडकर) यांचे कीर्तन दुपारी १२ ते १ महाप्रसाद,१ ते २ महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम,२ ते ३ विद्यार्थी गुणगौरव सोहळा व ३ ते ४  कार्यक्रमाचा पसायदानाने समारोप करण्यात येणार आहे. या जयंतीनिमित्ताने सकाळी ८ ते ४  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुल कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुतार लोहार संघटनेचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिंदे,रमेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, त्र्यंबकराव जगताप,मधुकर भागवत, संजय मोरे,रमेश शिरसागर,नारायण राजगुरू,महिला तालुकाध्यक्ष लक्षना आहेर,उत्सव समिती अध्यक्ष सोमनाथ जगताप,उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप,व स्वागत उत्सव समितीने केले आहे.