भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रमेश आहेर...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रमेश आहेर...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

निफाड तालुक्यातील दावचवाडी येथील बारा बलुतेदार महासंघ नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष रमेश आहेर यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात करण्यात आली. रमेश आहेर सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून कार्यरत असल्याने त्यांचा संपर्क ही दांडगा आहे. याशिवाय ते विराट विश्वकर्मा संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही काम करत आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली आहे.

त्यांच्या निवडीचे स्वागत करताना भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते भाजपा प्रदेश सदस्य परेश भाई शहा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय जोशी भाजपा निफाड मंडल उपाध्यक्ष दिनकरराव कुयटे पिंपळगाव गटप्रमुख निलेश शेळके नवनाथ ढोकळे आदींनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.आपण पक्षाच्या कार्याकरिता वेळ देऊन संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया रमेश आहेर यांनी यावेळी दिली.