पुण्याच्या राजश्री शाहू प्रतिष्ठानकडून बोरदरा सरपंच किरण पडवळ यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान..!

पुण्याच्या राजश्री शाहू प्रतिष्ठानकडून बोरदरा सरपंच किरण पडवळ यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान..!

News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक गंजपेठ पुणे येथे आयोजित राजश्री शाहू प्रतिष्ठान पुणे यांच्याकडून खेड तालुक्यातील बोरदरा गावचे सरपंच किरण पडवळ यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

बोरदरा सरपंच किरण पडवळ यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात उत्कृष्ट असे विकासात्मक कामे करून गावाला एक वेगळी ओळख मिळून दिली आहे. किरण पडवळ यांनी त्यांच्या कार्यकाळात गावातील सामाजिक, शैक्षणिक, प्रलंबित विकासात्मक कामे करून गावात एक विकासगंगा वाहून आणली व आपल्या गावाला एक वेगळ्या उंचीवर पोहचवले आहे. त्याच कामाची पोच पावती म्हणून किरण पडवळ यांना राजश्री शाहू आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या उपस्थित संपन्न झाला.

या पुरस्कार वितरण सोहळ्याला लिज्जत पापड कंपनीचे सल्लागार सुरेश कोते, दक्ष मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा राजश्री शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष भगवान श्रीमंदीलकर, कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष सतीश दरेकर, गौरव समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव गुरव, राष्ट्रवादी कोंग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष संतोष पाषाणकर आदि मान्यवर उपस्थित होते.