मा. मंत्री रजनीताई सातव यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन...

मा. मंत्री रजनीताई सातव यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली

काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या आणि दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या मातोश्री; माजी मंत्री रजनीताई सातव यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाल्याची दुःखद घटना घडली आहे.

दि. 18 फेब्रुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना; निधन झाले आहे.

रजनीताई सातव यांना सकाळी श्वासनाचा त्रास होत असल्याने, नांदेड येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. माजी मंत्री रजनीताई सातव 1980 मध्ये हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून निवडुन आल्या होत्या. तसेच दोन वेळा त्या विधानपरिषदेच्या आमदार होत्या. त्यांच्याकडे आरोग्य, महसुल, आदिवासी विकास, समाज कल्याण ही राज्यमंत्र्याची खाती त्याच्याकडे होती. तर काँग्रेस पक्ष वाढीसाठी त्यांनी खूप यशस्वी प्रयत्न केले आहेत.

तर प्रियदर्शनी सेवा संस्थेच्या माध्यमातून कळमनुरी येथे ग्रामीण भागातील मुला / मुलीसाठी महाविद्यालय, शाळा उघडून शिक्षणाची दारे खुली केली. स्व. खासदार राजीव सातव यांच्या त्या मातोश्री होत्या.