दिंडोरी शहरालगत असणाऱ्या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करा ग्रामस्थांची मागणी...
![दिंडोरी शहरालगत असणाऱ्या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करा ग्रामस्थांची मागणी...](https://news15marathi.com/uploads/images/202407/image_750x_66a7a8f8a0c21.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी शहरा लगत असणाऱ्या जाधव वस्ती व पिंगळ वस्ती येथे बिबट्याचा वावर असून अनेकांना या व्यक्तीने दर्शन दिलेले येथील दोन्हीही वस्तीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी केली आहे.
सध्या दिंडोरी शहरात अनेक ठिकाणी शेत मळ्यात बिबटे वास्तव्य करून आहेत.जाधव वस्तीवर व पिंगळ वस्तीवर बिबट्याने ठाण मांडले आहे. गेल्या काही वर्षांपासून या व्यक्तींचा दिवसेंदिवस वावर वाढत असून मागच्या वर्षीही येथील शेतकरी सुनील जाधव यांच्या शेतात वास्तव्यास होता. त्यानंतर हे बिबटे ऊस तोड झाल्यानंतर कोलवण नदी पात्र लागत वास्तव्याला गेले. हे बिबटे आता राज रोज फिरू लागले आहे. याशिवाय येथील दिंडोरी विंद्यावसिनी डोंगर व वणारवाडी परिसरात बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे अनेक पाळीव कुत्रे व गाई शेळ्या जनावरे बिबट्याने फस्त केले आहे.
आता पावसाळा सुरू असल्याने सर्वत्र गवत व झाडांची वाढ होत असल्याने बिबटे मानवी वस्ती लगत येत असल्याने येथील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.वन विभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नगरसेवक नितीन गांगुर्डे ग्रामस्थ शेतकरी यांनी केली आहे.