‘त्या’ आरोपीला 20 वर्षांची कैद.! विळवंडी येथील घटनेचा निकाल...
![‘त्या’ आरोपीला 20 वर्षांची कैद.! विळवंडी येथील घटनेचा निकाल...](https://news15marathi.com/uploads/images/202407/image_750x_66a7a85751321.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील विळवंडी येथे एका अल्पवयीन मुलीवर केलेल्या अतिप्रसंगाच्या संदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यात सदर आरोपीला २० वर्षे कैद व २५ हजाराचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दि.७ एप्रिल २०२३ रोजी बाळू विठ्ठल बेंडकोळी (२५) रा.विळवंडी ता.दिंडोरी याने एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला होता.या आरोपीवर दिंडोरी पोलिस ठाण्यात भा.द.वि.३७६ (2), ३७६ (3), ३५४ (अ),५०,पोक्सो ४,६,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी हा नात्याने पिडीत मुलीचा चुलत चुलता होता.पिडीत मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असतांना देखील तिचे तोंड दाबुन तिला घरात नेवून तिच्यावर अतिप्रसंग केल्याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास दिंडोरी पोलिस ठाण्याचे तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार यांनी केला होता. तपासाअंती आरोपीविरुध्द सबळ पुरावे प्राप्त करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.सदर गुन्ह्याची सुनावणी श्रीमती घुले विशेष अतिरीक्त सत्र न्यायालय क्र.५ यांच्या न्यायालयात झाली असून फिर्यादीच्या वतीने अतिरीक्त सरकारी अभियोक्ता लीना चंद्रकांत चव्हाण यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही पक्षाचे ऐकुण घेवून साक्षीदार व भौतीक पुरावे तपासून आरोपीविरुध्द पुरावा मिळुन आल्याने न्यायालयाने आरोपी यास भा.द.वि.क ३७६ (2) (एफ) व पोक्सो ४,८ मध्ये दोषी ठरवून २० वर्षे सश्रम कारावास व २५००० रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्षे साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.सदर सुनावणीत गेड पोलिस उपनिरीक्षक संजय पवार व पोलिस हवालदार अबोने यांनी काम पाहिले आहे.