BIG BREAKING : कळस बुद्रुक येथील कळसेश्वर देवस्थानात जबरी चोरी, देवीचे डाग दागिने लंपास…!
![BIG BREAKING : कळस बुद्रुक येथील कळसेश्वर देवस्थानात जबरी चोरी, देवीचे डाग दागिने लंपास…!](https://news15marathi.com/uploads/images/202210/image_750x_633805f2cf688.jpg)
News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
अकोले : तालुक्यातील भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जात असलेले आणि कळस बुद्रुक गावचे आराध्य दैवत असलेल्या कळसेश्वर देवस्थानात रात्री जबरी चोरी झाल्याची घटना उघड झाली आहे. देवस्थानातील वैष्णवी देवी मंदिरातील देवीच्या अंगावरील ऐवज, मुकुट चोरट्यानी चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर परमपूज्य सुभाषपुरी महाराज यांच्या समाधीपुढील दानपेटिही चोरट्याकडून फोडण्याचा प्रयत्न झाला पण त्यांना त्यात यश आले नाही.
आज पर्यंतच्या इतिहासात कळसेश्वर देवस्थान येथे असा कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही. परमपूज्य सुभाषपुरी महाराज यांचे देहावसन झाल्यापासून देवस्थानावर ट्रस्ट स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी ट्रस्टने सुरक्षा रक्षक नेमावा अशी मागणी आता कळस बुद्रुक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
घटनास्थळी अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दाखल झाले आहे. पोलिसांकडून परिसराची कसून चौकशी सुरु आहे. चोराचा लवकरात लवकर छडा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे.
.