मोठी बातमी : पिस्तूलासह एका इसमास गुन्हे शाखा युनिट तीनकडून अटक...

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
महाळुंगे इंगळे : विनापरवाना बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने एमआयडीसीतील एका कंपनीजवळ तरुणास ( दि.६ ) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास निघोजे (ता.खेड ) येथून जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, आकाश बाळु थोरात (वय.२६ वर्षे,रा.आरोग्यम हॉस्पीटलजवळ,चाकण,ता.खेड,जि.पुणे) यास अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आकाश थोरात हा पिस्तुल घेऊन निघोजे गावच्या हद्दीतील सावली हॉटेलला येणार आहे. त्याप्रमाणे गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी सापळा रचून सदर आकाश यास ताब्यात घेऊन पंचा समक्ष त्याची अंगझडतीत पॅन्टमध्ये खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्तुल मॅक्झीनसह मिळुन आले. तसेच खिशात ०१ जिवंत काडतुस मिळून आले आहे.
युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राजकुमार हनुमंते, यदु आढारी,मनोज साबळे,सोनवणे,दांगट,जैनक आदींनी ही कारवाई केली.