मोठी बातमी : मेफेड्रोन ड्रग्ज प्रकरणातील बातमीदारच ठरला कटाचा सूत्रधार, तीन आरोपी गजाआड..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : चाकण येथील चाकण ग्रँड येथे काळ्या रंगाचे स्कॉर्पिओ वाहनात एम. डी. ड्रग्ज हा अमली पदार्थ असुन खात्रीशीर बातमी मिळाल्याने चाकण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी छापा टाकून गाडीतून ड्रग्ज व आरोपीस ताब्यात घेतले होते. या घटनेने चाकण परिसरात खळबळ उडाली होती.
या प्रकरणाच्या संदर्भातील एक आरोपी व त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी नंबर MH12TD5621 ची झडती घेतली असता त्यामध्ये चालक बसण्याच्या सिटच्या पाठीमागील बाजूस सिटच्या कप्प्यात एका सिल्व्हर रंगाच्या पेपरमध्ये पांढऱ्या रंगाच्या पॉलीथीनच्या एकूण ८ छोट्या पिशव्यामध्ये पांढऱ्या रंगाची पावडर दिसून पोलिसांना मिळून आली होती. त्याच्या विरोधात पोलीस हवालदार सुनिल शिंदे यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस अँक्ट, १९८५ कलम ८(क), सह २२(ब)अन्वये सरकारतर्फे कायदेशीर तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर आरोपीस न्यायालयाने ५ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली होती. पोलीस कोठडीत चाकण डी. बी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे यांनी सखोल तपास केला असता आरोपी सांगत असलेल्या हकीकतीत तसेच गुन्ह्याच्या पद्धतीत तफावत आढळून आल्याने आरोपीचा पूर्वइतिहास व समाजातील स्थान यावरून आरोपी यास कोणीतरी जाणून बुजून एम. डी. ड्रग्ज या गंभीर अमली पदार्थच्या गुन्ह्यात अडकविण्याच्या प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.
या सखोल तपासानंतर चाकण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरून गुन्ह्यातील आरोपी तुषार कड, बातमीदार तसेच इतर संशयित लोकांची गोपनीय माहिती प्राप्त करून त्यांचे तांत्रिक विश्लेषण करून तसेच त्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे रेकॉर्ड पाहता त्याचे सलग काही दिवस डी. बी. पथकातील अंमलदारामार्फत पाळत ठेवून माहिती काढली असता. अटक आरोपी तुषार कड हा सांगत असलेल्या माहिती वरून सदरचे संशयित लोकांचे हालचाली या संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठाच्या सूचनेनुसार गुन्ह्याचा मुळा पर्यंत जाण्याच्या सूचना दिल्या होत्या.
वरिष्ठाच्या सूचना व मार्गदर्शना प्रमाणे बातमीदार यांच्यापासून उलट तपास करण्यास सुरुवात केल्यानंतर गुन्ह्यांची उकलं होण्यास सुरुवात झाली. पोलीस तपासात एम. डी. ड्रग्ज गंभीर गुन्ह्यातील खरी साखळी उघडण्यास सुरुवात झाली. यामध्ये अडकविण्यात आलेला आरोपी तुषार कड तसेच निखिल कड, राहुल टोपे, सर्व रा. वाकी, ता. खेड, जि. पुणे हे एकाच गावातील रहिवाशी असून त्यांचा जमीन खरेदी विक्री प्लॉटिंगचा एकत्रित व्यवसाय होता. व्यवसायातील पैशाचे देवाण घेवाणीतून तुषार कड यांचे निखिल कड व राहुल टोपे यांच्याशी वाद झालेले होते. त्यांनी बदला घेण्याच्या उद्देशाने व व्यवहार करीत असलेली जमीन आपल्यालाच मिळावी या उद्देशाने आरोपी नामें निखिल कड, राहुल टोपे यांनी त्याचा मित्र हनिफ मुजावर, रा. वडगावं पीर, ता. आंबेगाव, जि. पुणे व एम डी व अमली पदार्थाची बातमी देणारा वसीम शेख, रा. घोरपडी, पुणे यांनी मिळून संगनमताने नियोजनबध्य कट रचून तुषार कड याचे ताब्यातील काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत ड्रग्ज ठेवून त्याला गुन्ह्यात अडकविल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील तीन आरोपीना चाकण पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेचा तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक(गुन्हे)नाथा घार्गे, तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, गणपत धायगुडे, पोलीस अंमलदार सुनिल शिंदे, शिवाजी चव्हाण, हनुमंत कांबळे, राजू जाधव, भैरोबा यादव, ऋषींकुमार झनकर, सुदर्शन बर्डे, विकास तारू, सुनिल भागवत, महादेव बिक्कड, रेवनाथ खेडकर, शरद खैरनार, किरण घोडके, महेश कोळी यांनी केला आहे.