मोठी बातमी : खराबवाडीत एकाची आत्महत्या, सात दिवसात दुसरी घटना...!

मोठी बातमी : खराबवाडीत एकाची आत्महत्या, सात दिवसात दुसरी घटना...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : खराबवाडी गावातील हनुमान मंदिर समोरील कड वस्तीत भाड्याने राहत असलेल्या एका २३ वर्षीय परप्रांतीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून अनिवेश ओमकार पांड्ये (वय-२३ वर्षे), सध्या रा. कड वस्ती, मूळ राहणार जि.देवरिया, राज्य उत्तरप्रदेश या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खराबवाडी गावात मागील ७ दिवसात आत्महत्येची हि दुसरी घटना घडल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मागील आठवड्यात एका २२ वर्षीय तरुणींनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले होते. ती घटना ताजी असतानाच आज एका २३ वर्षीय तरुणाने आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेचा तपास महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

रूम मालकांनी आपल्याकडे भाडेकरू ठेवताना त्याची उचित चौकशी करायला हवा. फक्त पैसे भेटतात म्हणून भाडेकरू यांची कोणतीही शहानिशा न करता त्यांना  रूममध्ये ठेवले जाते. त्यांच्या संदर्भात निष्काळजी केल्यामुळे ते असे कृत्य करतात त्याचा त्रास रूम मालकांनाहि होत असल्याचे दिसून येत आहे. यापुढे रूम मालकांनी अशा परप्रांतीय व्यक्तीची माहिती जमा करून पोलीस ठाण्यात जमा करायला हवी. यातून आता किती रूम मालक किती शिक घेतात हेच पहावे लागेल.