यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या...
![यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या...](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66e834150e717.jpg)
प्रतिनिधी - किरण मुक्कावार, यवतमाळ
आर्णी येथील संभाजीनगर परिसरात क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्त्या करण्यात आली. या संदर्भात पोलिसांनी सांगितले की हल्ल्यात ठार झालेला बादल टाले हा संभाजीनगर येथील गणेश मंडळात जेवणासाठी गेला होता त्या ठिकाणी जेवण सुरु असतानाच मंडळातील काही युवकांसोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला त्यातूनच त्याच्यावर त्याच ठिकाणी असलेल्या विटा उचलून डोक्यावर प्रहार करण्यात आले त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नेले. ही घटना काल दिनांक 15 सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली मात्र
डॉक्टरांनी दवाखान्यात आल्यानंतर तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले. या प्रकरणात डॉक्टरांनी त्याचे पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी ठेवले असून त्याबाबतचा अहवाल पोलीस स्टेशन कडे देण्यात आला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असुन. हे दोन्ही आरोपी संभाजीनगर येथील रहिवासी आहे तर मृतक हा कमल पोस्टमध्ये राहणार आहे. दरम्यान गणपती मंडळ हे संभाजीनगर वार्डात मध्येच असून त्या ठिकाणी ही घटना नऊ वाजता च्या दरम्यान घडली. या घटनेतील अन्य आरोपी तपास मोहीम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी दिली.