बाप्पाला निरोप देण्याची गणेश भक्तांची लगबग.!

बाप्पाला निरोप देण्याची गणेश भक्तांची लगबग.!

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

 गेल्या काही दिवसांपासून कुटुंबातील एक सदस्य म्हणून गणरायाची दिवस रात्र पूजा केली जाते. मात्र आता सुरू असलेला उत्सव अंतिम टप्प्यात आल्याने गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांची लगबग श्री जाधव चे चित्र पाहावयास मिळत आहे. बघता बघता आठ दिवस कसे निघून गेले हे देखील समजले नाही.

दि. ७ सप्टेंबर रोजी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. तेव्हापासून शहराप्रमाणे ग्रामीण भागातही सोशल मीडियावर धाम धूम सुरू आहे. घरामधील गणपतीची आरस तसेच गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देणारे मेसेज मित्र कंपनीला शेअर केले जात आहे. याशिवाय बच्चा कंपनीच्या ओठावर असणारे व महाराष्ट्रातील तमाम गणेश भक्तांना ज्या  गाण्याने वेड लावले ते म्हणजे माझ्या पप्पांनी गणपती आणला हे गाणे सोशल मीडियावर युट्युब वर व इतर समाज माध्यमांवर हे गाणे प्रचंड व्हायरल होत आहे.

आजच्या या धकाधकीच्या जीवनात मित्र परिवाराला भेटणे शक्य नसल्याने अरे व्यवस्था म्हणून व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम व मेसेज या सोशल मीडिया माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहे. याशिवाय गणपती बाप्पाचे फोटो एकमेकांना फॉरवर्ड केले जात आहे याशिवाय आरती संग्रह चे व्हिडिओ बाप्पाचे वेगवेगळे व्हिडिओ स्टिकर्स यामुळे सध्या ग्रामीण भागात सर्वत्र सोशल मीडियावर बाप्पामय वातावरण तयार झाले आहे. यावर्षी वरून राजाची कृपा अधिक असून सुद्धा सर्वत्र जल्लोष उत्सव दिसत असल्याने सोशल  मीडियावरही गणेश उत्सवाची धूम दिसत आहे. नेटकरांनी कित्येक दिवस आधीच गणरायाचे फोटो मेसेज फॉरवर्ड केली आहे त्यामुळे सर्वत्र असे वातावरण असून सार्वजनिक मंडळी विविध उपक्रम राबवून उत्सव साजरा करीत आहे तालुक्यातील जानोरी गावांमध्ये अनेक वर्षांची परंपरा जपली जात असून यामध्ये जिवंत देखावे पहावयास मिळत असून त्या माध्यमातून धार्मिक,शेतकरी, पौराणिक,संस्कृती याचा मेळ घालून या माध्यमातून संदेश दिला जात आहे. दरवर्षी दिसणारा आरत्यांचा गजर आणि भक्तीचा जागर सध्या सर्वत्र गणेश भक्तांमध्ये पाहावयास मिळत आहे.