दिंडोरीत ए.टी.एम फोडून पाच लाखाची चोरी...

दिंडोरीत ए.टी.एम फोडून पाच लाखाची चोरी...

 प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी येथील पालखेडरोड ला असणाऱ्या एस बी आय बँकेच्या ए टी एम वर चोरट्यांनी डल्ला मारत पाच लाख रुपयांची चोरी केली असून भर वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे,या बाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 

सविस्तर वृत्त असे की, दिंडोरी येथील पालखेड रोड लगत असलेल्या एस बी आय बँकेचे ए.टी. एम मशीन असून शनिवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास ; काळ्या रंगाच्या चार चाकी गाडीतून दोन व्यक्ती आल्या.त्यांनी ए.टी.एम  मध्ये प्रवेश करत सीसीटी व्ही  कॅमेऱ्यावर स्प्रे मारत गॅस कटरच्या साहाय्याने ए.टी.एम मशीन कट करत त्यातील सुमारे पाच लाख रुपये घेऊन पोबारा केला.बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला असुन पुढील तपास पोलीस करत आहे.पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने,पोलिस उपअधीक्षक किरणकुमार सुर्यवंशी,यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपींच्या शोदार्थ पथके रवाना केली आहे.

दूरध्वनी बंद मुळे चोरट्यांचे फावले.!

दिंडोरी पोलीस ठाण्याचा लँडलाईन दूरध्वनी गेल्या एक महिन्यापासून बंद आहे. बँकेच्या सीसीटी व्ही यंत्रणेमुळे  तेथिल कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या लँडलाईन क्रमांक 02557221033 वर  फोन केला मात्र दुरध्वनी बंद असल्याने पुन्हा नाशिक येथे कंट्रोल रूमला फोन करून दिंडोरी येथील कार्यरत पोलिसांना संपर्क केला असता त्यात वेळ गेल्याने फक्त तीन मिनिटांच्या उशीराने  चोरट्यांचे फावले.