BIG BREAKING : अरे.. या महाळुंगे गावात चाललंय तरी काय? स्थानिक युवकांकडून एकावर फायरिंग..!

BIG BREAKING : अरे.. या महाळुंगे गावात चाललंय तरी काय? स्थानिक युवकांकडून एकावर फायरिंग..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : सध्या चाकण औद्योगिक वसाहतीत महाळुंगे गावात गुन्हेगारांनी हैदोस माजवला असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. दसरा सणाच्या रात्री सौरभ मुळे नामक तरुणांने गावातील भैरवनाथ मंदिराच्या बाजूला गरभा खेळत असलेल्या ठिकाणावरून बाजूला घेऊन त्याच्यावर फायर केल्याची आणि त्यांच्या सहकार्याला विटाने मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, १२ ऑक्टोबर रोजी दसरा सणाच्या निमित्ताने रात्री १०:१५ वाजताच्या सुमारास महाळुंगे गावातील भैरवनाथ मंदिरा जवळ, छावा प्रतिष्ठान मित्र मंडळ येथे गरभ्याचा कार्यक्रम सुरू असताना आरोपी सौरभ मुळे व शंकर नवगणे यांच्यात भांडण झाले होते. काही वेळाने शंकर यांची पत्नी व सौरभची आई यांचे मंडळाचा गरभा सुरू होता त्याठिकाणी जोरदार भांडण झाले. यांच्या भांडणामुळे दांडियाचा कार्यक्रम बंद केल्यामुळे तेथील स्थानिक महिलांनी सौरभ यांच्या सोबत भांडण करून आमच्या भागात राहत असून आमच्यावर दादागिरी करतो का? असे बोलून त्याला हातानी, बुक्यानी व चपलानी मारहाण केली. 

सौरभला मारहाण झाल्यामुळे त्यांच्या बरोबर असलेल्या दोन सहकाऱ्यांपैकी एका सहकार्याने निलेश असाटी याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या जवळ असलेल्या पिस्टलने निलेशवर फायर केली. फायरमध्ये एक गोळी निलेशच्या छातीवर मारून निलेशला गंभीर जखमी केले आहे. तसेच सौरभ बरोबर असलेल्या दुसऱ्या सहकार्याने फिर्यादी सूरज गणपत कदम याच्या डोक्यात वीट मारून गंभीर दुखापत केली. आरोपी यावरच थांबले नाही तर त्यांनी घटना घडल्यानंतर हवेत गोळीबार करून परिसरात मोठी दहशद माजवली होती. यामुळे काही काळ परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

चाकण औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे गाव हे गुन्हेगारीचे केंद्र बनू पाहत आहे. मागील काही दिवसापूर्वी काही स्थानिक संघटित गुन्हेगारांवर महाळुंगे MIDC पोलिसांकडून तडीपारी व मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तरी महाळुंगे गावातील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाही. आता यावर पोलिसांनी कडक पाऊले उचलून ठोस अशी कडक कारवाई व्हायला हवी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

या प्रकरणात आरोपी सौरभ मुळे(वय-२७ वर्षे)रा. महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे व त्याचे दोन सहकारी यांच्यावर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८(१), ३(५), आर्म अँक्ट ३/२५ क्रिमिनल लॉ अँमेन्टमेन्ट अँक्ट ३, ७ व महा. पोलीस कायदा कलम ३७(१)(३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे MIDC पोलीसाकडून आरोपीचा शोध सुरू आहे. 

या घटनेचा पुढील तपास महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते हे करत आहेत.