लाडक्या बहीणींना धक्का? 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार...

लाडक्या बहीणींना धक्का? 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार...

प्रतिनिधी - पुणे

विधानसभा निवडणुकी आधी महायुती सरकार अर्थात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - अजित पवार सरकारने राज्यातील जवळपास सर्वच महिलांना लाडक्या बहिणी म्हणून घोषित करत; अशा लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रु. देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार या सर्व पात्र लाडक्या बहिणींना महिन्याला किंवा एकदम 1500 ते 3000 हजार रुपये मिळू लागले होते. 

परंतु, त्यावेळी सरसकट झालेल्या पात्र लाडक्या बहिणी आता मात्र.! वेगवेगळ्या नियम व अटी आणि योजनामुळे अपात्र ठरू लागल्या आहेत.

माहितीनुसार; लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेतील समोर आलेल्या अटीनुसार, एकाच वेळी दोन योजनांचा लाभ घेता येणार नाही. राज्यातील ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत; त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे.

त्यामुळे आता राज्यात सुमारे आठ लाख महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले असून, अशा लाडक्या बहिणींना 1500 रुपयाऐवजी फक्त 500 रुपायवर समाधान मानावे लागणार आहे.

तर सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी मात्र निशाणा साधला आहे. निवडणुकी आधीच्या सर्व लाडक्या बहिणी; हळूहळू (निवडणुकीनंतर) लाडक्या राहिल्या नाहीत असा आरोप करण्यात येत आहे.