दिंडोरी येथे राहुलजी गांधी यांच्या वरील टिकेचा काँग्रेसकडून निषेध
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
देशाचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर भाजप व मित्र पक्षांचे नेते खालच्या पातळीवर टीका करीत आहे टीका करताना भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांना तुमच्या आजीसारखी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्यासारखी अवस्था करून टाकू दुसऱ्या भाजप नेत्यांनी माननीय राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटले गेले व शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीप कापून आणणाऱ्याला अकरा लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आल व भाजपचे राज्यसभा खासदार अमरावतीचे खासदार अनिलजी बोंडे यांनी राहुल गांधींना जिभेला चटके द्द्यायला पाहिजे अशाप्रकारे राहुल गांधींना जीवे मारण्याचा कट आखला जात आहे काही लोक मारण्याच्या सुपाऱ्या देत आहे बक्षीस जाहीर करीत आहेत ह्या सगळ्यांचा काँग्रेस तर्फे जाहीर निषेध करण्यात आला व दिंडोरी तहसीलदार मुकेश कांबळे व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना निवेदन देऊन या वाचाळविरांवर तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करून त्यांना त्वरीत अटक करावी अशी मागणी दिंडोरी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे निषेध व्यक्त करून करण्यात आली आहे.
याप्रसंगी निवेदन देताना दिंडोरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाशजी पिंगळ,सुनील आव्हाड,पंडितराव गायकवाड, नामदेव राऊत,वाळू जगताप,गुलाब तात्या जाधव,अनुसूचित जातीचे तालुकाध्यक्ष श्याम गवारे, दिलीप शिंदे,शिवाजी पागे,मंगेश बोके,सचिन आव्हाड,पारूबाई डंबाळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.