वलखेड येथे एकता मंडळातर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात
![वलखेड येथे एकता मंडळातर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66ec2855e39d2.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण नाशिक
दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथील एकता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाकडून यंदा गणेश उत्साहात सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम बुधवार दि. १७ रोजी सायंकाळी ८ वाजता अतिशय उत्साहात पार पडला.
येथील एकता मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सरपंच विनायक शिंदे यांच्या संकल्पनेतून येथे न्यू होम मिनिस्टर हा खास महिलांसाठी आगळावेगळा असणारा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये मोठ मोठे बक्षीस ठेवण्यात आले होते येथील संभाजी महाराज सभा मंडपात होणाऱ्या कार्यक्रमात पंचक्रोशीतून महिलांनी या ठिकाणी येऊन एकच गर्दी करीत कार्यक्रमाचा आनंद लुटला खास महिलांसाठी होणाऱ्या या कार्यक्रमात उखाणे,गप्पागोष्टी,हिंदी मराठी गाणे, कॉमेडीचा तडका असा कार्यक्रम संपन्न होऊन कार्यक्रमात बक्षिसांची खैरात करण्यात आली त्यामध्ये प्रथम बक्षीस फ्रिज,दुसरे वॉशिंग मशीन, तिसरे एलईडी टीव्ही,चौथे ओव्हन, पाचवे मिक्सर व उत्तेजनार्थ पैठणीचे वाटप यावेळी करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकता मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.