तळेगाव दिं. येथिल कुस्तीपटुंचा ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार...
![तळेगाव दिं. येथिल कुस्तीपटुंचा ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार...](https://news15marathi.com/uploads/images/202309/image_750x_6512dc4839d19.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
तालुक्यातील तळेगाव दिं. येथिल उन्नती माध्यमिक विद्यालयातील नुकत्याच पार पडलेल्या कुस्त्यांमध्ये २ विद्यार्थीनींनी प्रथम व व्दितीय क्रमांक मिळविल्याबददल त्यांचा तळेगाव दिं. येथिल सरपंच सोनाली चारोस्कर, उपसरपंच प्रविण कथार यांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याचबरोबर क्रिडा शिक्षक अमोल पवार, रोहन कोराळे, किशोर क्षिरसागर यांचाही गुलाबपुष्प, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच सोनाली चारोस्कर, उपसरपंच प्रविण कथार, माजी सरपंच अजय चारोस्कर, शालेय समिती अध्यक्ष केशव उगले, प्राचार्य राजेंद्र पितृभक्त, तंटामुक्त समिती अध्यक्ष कांतीलाल घुगे, सागर चकोर, वैभव कथार, धनंजय ढाकणे, विशाल ढाकणे, अजिंक्य ढाकणे, संतोष चारोस्कर आदी उपस्थित होते.