पॅरिस ऑलिंपिक मधून भारताला दुसरा धक्का.! तर खेळाडूला थेट देश सोडण्याचे आदेश...
NEWS1 5मराठी रिपोर्ट...
कुस्तीपटू विनेश फोगाट यांना पॅरिस ओलंपिकमधून अपात्र करण्यात आल्याने, भारताला एक मोठा धक्का बसलेला आहे. त्यातच आता आणखी एक धक्का पॅरिस ऑलिम्पिक मधून भारताला बसला असून, अन्य एका भारतीय महिला कुस्तीपटूला थेट पॅरीस सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंतिम पंघाल असं या कुस्तीपटूचं नाव आहे.
तिची ऑलिम्पिक व्हिलेजमधील सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. इतकच नाही तर अंतिमला थेट पॅरीस सोडण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. अंतिम पंघालविरुद्ध तिच्या बहिणीमुळे कारवाई झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार अंतिम पंघाल पराभवानंतर तिच्या खासगी प्रशिक्षकांना आणि स्पेरिंग पार्टनरला भेटायला गेली होती. त्यावेळेस तिने स्वत:चं खास ओळखपत्र बहीण निशाला दिलं आणि खेळाडूंची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या ऑलिम्पिक व्हिलेजमधून सामान घेऊन येण्यास सांगितलं. मात्र या ठिकाणी खेळाडू वगळता इतर कोणालाही प्रवेश नसतानाच बहिणीचं कार्ड वापरुन प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना; अंतिमच्या बहिणीला म्हणजे निशाला सुरक्षारक्षकांनी पकडल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आलं. आता स्पर्धेतील अंतिमचं आव्हान संपुष्टात आल्याने आणि तिने नियमांचं उल्लंघन केल्याने तिला तातडीने पॅरीस सोडण्याचे आदेश भारतीय ऑलिम्पिक महासंघाने दिले आहेत.
ऑलिम्पिक व्हिलेज हे खास ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या सोयीसाठी तयार करण्यात आलं असून येथे प्रवेशासंदर्भातील नियम फार कठोर आहेत. या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी प्रत्येक खेळाडूला विशेष कार्ड देण्यात आले आहेत. अंतिमच्या नावाने असलेले हेच कार्ड तिच्या बहिणीने वापरण्याचा प्रयत्न करुन नियमांचं उल्लंघन केल्याने तिच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. आता या कारवाईमुळेच अंतिमसहीत तिच्या सोबतच्या चौघांना पॅरीस सोडावं लागणार आहे.