अक्राळे येथे तालुकास्तरीय अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात संपन्न...
![अक्राळे येथे तालुकास्तरीय अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात संपन्न...](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_65aa8bcb618aa.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
यावेळी अक्राळेचे सरपंच अर्चना डगळे,उपसरपंच संदीप केंदळे,शालेय समिती अध्यक्ष अनिल गाडे, तंटामुक्ती अध्यक्ष सिताराम गायकवाड, बापू गायकवाड, माजी सरपंच गोटीराम बदादे,गोरक्ष गायकवाड गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी आदींच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी शिक्षण विस्तारधिकारी सुनीता आहिरे, वंदना चव्हाण,कैलास पगार यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख तसेच मोहाडी, उमराळे,माळेदुमाला, जोपूळ,देवसाने,दिंडोरी,कोशिंबे, ननाशी,वणी या बीटातील सहभागी शाळेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. यावेळी इयत्ता १ ली ते ४ थी लहान गट तर इयत्ता ५ वी ते ८ वी मोठा गट यामध्ये स्पर्धा झाल्या. यावेळी परिक्षक म्हणून जिल्ह्यातील इतर शिक्षकांना बोलविले होते. यामुळे परिक्षण करतांना पारदर्शकपणे परिक्षण झाल्याने सहभागी शाळांनी देखील समाधान व्यक्त केले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रिडाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमात केलेले सादरीकरण हे उल्लेखनीय होते.परिक्षकांना परिक्षण करतांना मोठा पेच निर्माण झाला होता. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचे विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी तहसीलदार पंकज पवार पोषण आहार अधीक्षक रूपाली पगार ज्येष्ठ पत्रकार बापू चव्हाण संदीप गुंजाळ आदींनी भेटी देऊन या स्पर्धांचे कौतुक केले.तालुकास्तरीय स्पर्धा आयोजनात अक्राळे येथील ग्रामपंचायत,शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी प्रत्येक स्पर्धेत प्रथम,व्दितीय व तृतीय असे तीन क्रमांक काढण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक, ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी मोठा जल्लोष करण्यात आला. मागील दोन्ही वर्षी जिल्ह्यात सर्वात जास्त बक्षिस मिळवून सलग दोन वर्ष अथ्यक्ष चषक मिळविणारा तालुका म्हणून दिंडोरीचा उल्लेख झाला आहे. आता तिसर्यांदाही या अध्यक्ष चषकांवर दिंडोरीचे नाव कोरले जाईल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.
लहान गट :-
वक्तृत्व स्पर्धा :- प्रमथ क्रमांक - अपेक्षा धरत (वनारवाडी), व्दितीय क्रमांक -आर्यन गांगुर्डे (दिंडोरी), तृतीय क्रमांक - श्रावणी राहणे (बेलगाव),
चित्रकला स्पर्धा : - प्रमथ क्रमांक -राणी धुळे (वाघाड), व्दितीय क्रमांक - गौरी गायकवाड (भोकरपाडा), तृतीय क्रमांक - मयुर भोये (करंजखेड)
100 मीटर धावणे (मुली) : - प्रमथ क्रमांक - साक्षी पवार (जऊळके वणी), व्दितीय क्रमांक - कावेरी गोतरणे (नवेधागूर), तृतीय क्रमांक - रिया गोडसे (निगडोळ),
200 मीटर धावणे (मुले) : - प्रमथ क्रमांक - कृष्णा लिलके (जांबुटके), व्दितीय क्रमांक - तुषार चौधरी (कोकणगाव खु.), तृतीय क्रमांक - करण कोंगे (महाजे )
बुद्धीबळ : - प्रमथ क्रमांक - खुशाल भरसट (कवडासर), व्दितीय क्रमांक - रियांशु देवरे (करंजखेड), तृतीय क्रमांक - भावेश पालवी (चाचडगाव ).
स्पेलिंग बी : - प्रमथ क्रमांक -अवनी सुरशे (दिंडोरी), व्दितीय क्रमांक - रियांशु देवरे (करंजखेड), तृतीय क्रमांक -कल्याणी संधान (चिंचखेड).
वैयक्तिक नृत्य : - प्रमथ क्रमांक -तेजस्विनी गीते (दिंडोरी), व्दितीय क्रमांक - कविता पीठे (आंबाड), तृतीय क्रमांक - मयुरी पवार (जानोरी).
वैयक्तिक गीत गायन : - प्रमथ क्रमांक - संजना गायकवाड (गवळीपाडा), व्दितीय क्रमांक - ईश्वरी गायकवाड (जोपूळ), तृतीय क्रमांक - देवीदास राऊत (हनुमंतपाडा).
समुह नृत्य : - प्रमथ क्रमांक - जि. प. शाळा चिंचखेड, व्दितीय क्रमांक - जि. प. शाळा नळवाडी.
समुह गीत गायन : - प्रमथ क्रमांक - जि. प. शाळा जऊळके दिंडोरी, व्दितीय क्रमांक - जि. प. शाळा नळवाडी.
मोठा गट :-
वक्तृत्व स्पर्धा :- प्रमथ क्रमांक - अनुष्का शेवाळे (जांबुटके), व्दितीय क्रमांक - तुषार फलाणे (अक्राळे), तृतीय क्रमांक - पुनम फुगट (पुणेगाव).
चित्रकला स्पर्धा : - प्रमथ क्रमांक - धनश्री बागूल (माळेदुमाला), व्दितीय क्रमांक - दिव्या उगले (लोखंडेवाडी), तृतीय क्रमांक - खुशाल गायकवाड (आंबाड).
200 मीटर धावणे (मुली) : - प्रमथ क्रमांक - वर्षा गायकवाड (आंबाड), व्दितीय क्रमांक - पल्लवी भोये (रवळगाव), तृतीय क्रमांक - रुपाली कोंगे (महाजे).
400 मीटर धावणे (मुले) : - प्रमथ क्रमांक - प्रकाश कोरडे (महाजे), व्दितीय क्रमांक - सचिन बोंबले (पिंप्रज), तृतीय क्रमांक - विशाल चौधरी (पिंप्रीअंचला),
बुद्धीबळ : - प्रमथ क्रमांक - रोशन गायकवाड (पिंंपळगाव धुम), व्दितीय क्रमांक -आदिती जाधव (तीसगाव), तृतीय क्रमांक -गणेश भुसार (अहिवंतवाडी).
स्पेलिंग बी : - प्रमथ क्रमांक -श्रावणी धुळे (पुणेगाव), व्दितीय क्रमांक- रोहित पगारे (लखमापूर), तृतीय क्रमांक-साक्षी मोरे (जालखेड).
खो - खो (मुले) : - प्रमथ क्रमांक - जि. प. शाळा महाजे, व्दितीय क्रमांक - जि. प. शाळा पुणेगाव.
खो - खो (मुली) : - प्रमथ क्रमांक - जि. प. शाळा महाजे, व्दितीय क्रमांक - जि. प. शाळा पुणेगाव.
कबड्डी (मुले) : - प्रमथ क्रमांक - जि. प. शाळा लोखंडेवाडी, व्दितीय क्रमांक - जि. प. शाळा कोकणगाव बु.
कबड्डी (मुली) : - प्रमथ क्रमांक - जि. प. शाळा महाजे, व्दितीय क्रमांक - जि. प. शाळा तीसगाव.
वैयक्तिक गीत गायन : - प्रमथ क्रमांक - पल्लवी गांगोडे (पिंपळगाव धुम), व्दितीय क्रमांक - निखील शार्दुल (अक्राळे), तृतीय क्रमांक - प्रमिला गायकवाड (पिंपळपाडा).
समुह गीत गायन : - प्रमथ क्रमांक - जि. प. शाळा जऊळके दिंडोरी, व्दितीय क्रमांक - जि. प. शाळा नळवाडी.
वैयक्तिक नृत्य : - प्रमथ क्रमांक -किर्ती फुगट (चिंचखेड), व्दितीय क्रमांक - यशोदा वायंकडे (महाजे), तृतीय क्रमांक - देवयानी गायकवाड (अक्राळे).
समुह नृत्य : - प्रमथ क्रमांक - जि.प. शाळा पिंपळपाडा, व्दितीय क्रमांक - जि.प.शाळा देवठाण.