बोडगेवार विद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड...
![बोडगेवार विद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड...](https://news15marathi.com/uploads/images/202310/image_750x_6525698e899d2.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - गजू कैलासवार, पाटणबोरी
पाटणबोरी येथील स्व. राजारामजी बोडगेवार कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पाटनबोरी या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकली असून, त्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.
जिल्हा स्तरावर निवड झाल्या बद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. सिनुअण्णा नालमवार यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच प्राचार्य रवींद्र कटकोजवार, प्रा.अविनाश भोयर, प्रा.लता सोमवार, प्रा.अनिकेत मद्दलवार, श्री. उदय उप्परवार यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले .ऐसान अन्सारी, उनेस तवर, अनस तवर, गोपाल वडस्कर,शिव अंदकुलवार,चेतन चवलेवार,अभिषेक मेंत्यालवार, इस्माइल खान,प्रेम वकिल,राजू मंत्रिवार,सुमित चींतकुटलावार, अतिक जाटू, करण मुत्यलवार,रोहित मुत्यालवर, प्रणय बोड्डूवार या खेळाडूना पांडूरंग गोपेवार यांचे मार्गदर्शन लाभले.