चिंचखेड कुस्ती स्पर्धेत शुभम मोरेची बाजी...

चिंचखेड कुस्ती स्पर्धेत शुभम मोरेची बाजी...

NEWS5 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण नाशिक

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे नुकतीच खंडेराव महाराज यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात्रेमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रथ मिरवणूक,हजेरी लावणे, आदीसह यात्रा निमित्ताने भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

कुस्ती स्पर्धेमध्ये जालखेड येथील पैलवान शुभम मोरे व बार्शी जिल्हा सोलापूर येथील पैलवान यांच्यात शेवटची कुस्ती खेळवण्यात आली यामध्ये पैलवान शुभम मोरे याने बार्शी येथील पैलवानाला चितपट करून ही कुस्ती जिंकली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शुभम मोरे याला सात हजार रुपये व ट्रॉफी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भास्कर भगरे बांधकाम विभागीय अधिकारी उमाकांत देसले यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले याप्रसंगी सोसायटीचे संचालक दादा पाटील त्र्यंबकराव संधान शेतकरी संघाचे संचालक सुनील मातेरे खंडेराव संधान यात्रा कमिटी अध्यक्ष शिवानंद संधान सुभाष मातेरे दत्तात्रय संधान सुधाकर संधान सोमनाथ मातेरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.