जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत जिल्हास्तरीय खेळ, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा संपन्न...
![जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत जिल्हास्तरीय खेळ, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा संपन्न...](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65cfa71f300da.jpg)
प्रतिनिधी - किरण मुक्कावार, यवतमाळ
जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत जिल्हास्तरीय खेळ, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन यवतमाळ येथील नेहरू स्टेडियम येथे करण्यात आले होते. यामध्ये मुडाना येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा मुडाणा येथील विद्यार्थिनींनी बंजारा समाजातील नृत्य अतिशय उत्कृष्ट पणे सादरी करण करून, प्रेक्षकांचे व जिल्ह्यातील अनेक अधिकारी वर्गांचे मन जिंकले.
भारतीय विविधतेतील स्वतंत्र संस्कृती जोपासणारा समाज म्हणून बंजारा समाजाकडे बघितले जाते. बंजारा समाज हा सुसंस्कृत आणि विविधतेने व संत सेवालाल महाराजांच्या आधुनिक विचाराने संपन्न आहे. त्यांची आगळीवेगळी वेशभूषा/केशभूषा यांनी या गीतातून दर्शविली आहे. या गीतामध्ये कुमारी नव्या दिलीप जाधव, तनुश्री सुनील राठोड, उमा विठ्ठल राठोड, शिवानी नामदेव जाधव या सर्व सातव्या वर्गातील विद्यार्थिनी असून, शाळेचे मुख्याध्यापक वानखेडे सर यांच्या मार्गदर्शनात प्रल्हाद राठोड सर तसेच विषय शिक्षिका वनिता गोविंदवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महागाव तालुक्यातील मुडाणा येथील केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा ही तालुक्यात विशेष म्हणून विविध उपक्रमात नेहमीच अग्रेसर असते.