मनसे युवा सेनेच्यावतीने विविध मागण्याचे निवेदन...
![मनसे युवा सेनेच्यावतीने विविध मागण्याचे निवेदन...](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65cfa40fc8d39.jpg)
मनसे युवा सेनेच्यावतीने विविध मागण्याचे निवेदन...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनसेचे जिल्हाध्यक्ष मनोज गोवर्धने यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सौ. सूर्यवंशी यांना देण्यात आले.
निवेदनात विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न तसेच सरळसेवा भरती अर्जसाठीचे शुक्ल १०० रु करण्यात यावे आदी विषयांचा समावेश आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष संदीप भवर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी, उमेश भोई, बाजी मते, मनविसे तालुकाध्यक्ष अभिजित राऊत, मनविसे उपजिल्हाध्यक्ष ऋषिकेश झोटिंग, शहराध्यक्ष शैलेश सोनवणे, दिलीप जाधव, सिंद्थु दांडेकर, स्वप्नील दळवी, आकाश सोनवणे, रोहित चारोस्कर आदींसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.