पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक संपन्न...
![पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक संपन्न...](https://news15marathi.com/uploads/images/202309/image_750x_650d5db5a6677.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आज दि.२२ रोजी नुकतीच संचालक मंडळाची तातडीची बैठक सभापती दिलीप काका बनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत संचालक मंडळ व व्यापारी आडतदार उपस्थित होते. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे रोख आणि २४ तासाच्या आत देण्यात यावे. हे पैसे सकाळी १० ते रात्री ८ वाजे पर्यंत देणे व या पावतीवर खरेदीदाराचे नाव, ज्या दराने माल खरेदी केला आहे त्याच दराने तो माल व्यापाऱ्यांनी माल खाली करावा त्यानंतर परत भाव करता येणार नाही अशी चर्चा झाली.
याशिवाय बैठकीमध्ये चुकीचे काम करणाऱ्या खरेदीदारांवर कडक कारवाई करण्यात येणार असून, याबाबत बैठकीत नियमावली तयार करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी थांबवू नये अशी विनंती व्यापारी असोसिएशन यांना संचालक मंडळाच्यावतीने करण्यात आली.