प्रा. अशोक बागुल (सर) यांची दिंडोरी शहरात नागरिकांना सदिच्छा भेट...

प्रा. अशोक बागुल (सर) यांची दिंडोरी शहरात नागरिकांना सदिच्छा भेट...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी पेठ विधानसभा - निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून; इच्छुक असणारे उमेदवार प्राचार्य अशोक देविदास बागुल (सर) यांनी आज दिंडोरी शहरातील नागरिकांना सदिच्छा भेट देऊन दिंडोरी तालुका पत्रकार संघाच्या पत्रकारांची देखील भेट घेतली.

याप्रसंगी तालुका पत्रकार संघाच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब अस्वले, अशोक निकम, संदीप गुंजाळ, अशोक केंग, नगरसेवक नितीन गांगुर्डे, मा. केंद्रप्रमुख राजेंद्र गांगुर्डे यांनी; प्राचार्य अशोक बागुल यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून, पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी सचिन कड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.