डॉ. विलास देशमुख यांची शिव आरोग्य सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्ष पदी निवड

डॉ. विलास देशमुख यांची शिव आरोग्य सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्ष पदी निवड

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्याचे भूमीपुत्र निष्ठावंत शिवसैनिक डॉ.विलास देशमुख यांची शिवसेना प्रणित शिवसेना आरोग्य सेनेच्या नाशिक जिल्हा प्रमुख पदी.! पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिव आरोग्य सेनेच्या प्रमुख डॉ. शुभा राऊळ, कार्याध्यक्ष डॉ.किशोर ठाणेकर यांनी नियुक्ती करून, नियुक्तीचे पत्र आज शिवसेना भवनात शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते, उपनेते रवींद्र मिर्लेकर, आरोग्य सेनेचे राज्य समन्वयक भाऊ कोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले. त्यांच्या या निवडीचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.