दिंडोरी तालुका शेतकरी सहकारी संघ स्विकृत व निमंत्रीत संचालकांची निवड...

दिंडोरी तालुका शेतकरी सहकारी संघ स्विकृत व निमंत्रीत संचालकांची निवड...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुका शेतकरी सहकारी संघाची नुकतीच नुकतीच बैठक आयोजन करण्यात आली होती. या बैठकीत स्विकृत व निमंत्रित संचालकांची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी चेअरमन बाळासाहेब जाधव होते.

यावेळी बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी स्विकृत संचालकपदी नामदेव धोंडीराम घडवजे, दिनकर मुरलीधर जाधव यांची तर निमंत्रीत संचालकपदी नवनाथ शांताराम नाठे, वाळू कचरु जगताप, शशीकांत नामदेव गामणे, प्रकाश भिमाजी पिंगळ, बाळासाहेब दत्तू महाले, गणेश नामदेव हिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित स्विकृत व निमंत्रित संचालकांचा चेअरमन बाळासाहेब जाधव, व्हा.चेअरमन रघुनाथ पाटील व संचालक मंडळाच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक गुलाब जाधव, सुनील मातेरे, राहुल जाधव, संतोष कथार, धर्मराज राऊत, रमेश मवाळ, बाळासाहेब धुमणे, सचिव संजय जाधव आदी उपस्थित होते.