वारे येथील आरोग्य शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद, शिबिरात १०० रुग्णांची मोफत तपासणी

वारे येथील आरोग्य शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद, शिबिरात १०० रुग्णांची मोफत तपासणी

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील वारे येथे राजश्रय फाउंडेशन यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आज बुधवार दिनांक ७ रोजी आयोजन केले होते.

यावेळी या शिबिरामध्ये रुग्णांचे उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वासनाचे विकार, महिला व बालकांच्या आरोग्य संबंधित मोफत तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये जवळपास १०० रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी डॉ. रवींद्र धवन, डॉ. सुहास पाटील, डॉ. स्वाती पाटील आणि डॉ. ज्ञानराजे यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. याप्रसंगी राजश्री फाउंडेशनचे निलेश देशमुख शिवराजे राजश्री राजे आधी उपस्थित होते.

शिबिरात येणाऱ्या सर्व रुग्णांचे सौ. पंचभुला गांगोडे व सजन गावित यांनी आभार मानले.