धक्कादायक बातमी.! महापालिकेच्या रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू...

धक्कादायक बातमी.! महापालिकेच्या रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू...

NEWS15 रिपोर्ट - ठाणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या; ठाणे येथून एक धक्कादायक बातमी समोर आली असून, महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत चक्क 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला असून, प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अनेक संशयित प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या रुग्णालयात 2 दिवसांपूर्वीच उपचार न मिळाल्याने एकाच दिवशी 5  जणांचा मृत्यू घटना घडली होती. आणि ही घटना ताजी असतानाच; आता पुन्हा याच रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 13 रुग्ण हे आय सी यू मधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्ड मधील होते.

रुग्णालय प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला असून, काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटल मधून शेवटच्या क्षणी आल्याने तर काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.

सिव्हील रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत असल्याने, डॉकटर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे. 

10 तारखेला एकच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन आंदोलन केले होते. आता केवळ रात्री 10.30 पासून सकाळी 8.30 पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे