पांढरकवडा येथे पुरुषोत्तम मासानिमित्त मोठ्या प्रमाणात गोदान...

पांढरकवडा येथे पुरुषोत्तम मासानिमित्त मोठ्या प्रमाणात गोदान...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - गजू कैलासवार, पांढरकवडा

पांढरकवडा येथील गोरक्षण संस्थान समितीने दि. 12 ऑगस्ट शनिवार रोजी मोठे पुण्याचे कार्य पार पाडले आहे. या समितीने गोरक्षण संस्थानात इच्छुक गोभक्तांसाठी; गोदान करण्याची पूर्ण व्यवस्था करून ठेवली होती. पूजेच्या साहित्यापासून ते भटजीपर्यंत सर्वच व्यवस्था उपलब्ध केल्यामुळे बऱ्याच गोभक्तांनी मोठ्या प्रमाणात गोदान करून, कार्यक्रमाची शोभा वाढविली. 

सोहम दीपकजी गुप्ता नागपूर, दामोदर बाजोरिया, बजरंग शर्मा, नारायण प्रसाद शर्मा, श्रीमती गोब्रा देवी चोटिया अशा 33  भक्तांनी गोदान केले.